Lokmat Political News | Uma भारतींचा राजकीय संन्यास पुन्हा निवडणूक लढणार नाहीत | Lokmat News

2021-09-13 0

उमा भारती या मध्य प्रदेशच्या झांसी मधून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. उमा भारती दोनवेळा खासदारकीच्या निवडणुकीत जिंकल्या. पक्षासाठी मी बरच काम केलं. पण आता गुडघा आणि पाठीच्या त्रासामुळे काम करणं अवघड जात असल्याचं उमा भारती म्हणाल्या.त्यामुळे ह्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही,निवडणूक लढणार नसले तरी पक्षाचं काम करत राहिनं, असं स्पष्टीकरण उमा भारतींनी दिलं आहे. उमा भारती या सध्या पेयजल मंत्री आहेत. १९८४मध्ये उमा भारतींनी पहिल्यांदा निवडणूक लढली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर १९८९मध्ये त्यांनी खजुराहो मतदारसंघातून निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर १९९९ पर्यंत त्या खासदार राहिल्या. यानंतर भोपाळ मधून त्यांनी निवडणूक लढायला सुरुवात केली.लोकप्रतिनधी असताना उमा भारतींनी अनेक मंत्रीपदं भुषवली आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires